बनावट आधार कार्ड कसे ओळखावे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आधार कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आता ते सगळीकडे अनिवार्य देखील झाले आहे. त्याशिवाय अनेक गोष्टी होऊ शकत नाहीत. जसजशी त्याची गरज वाढली आहे, त्याच प्रकारे त्याचा गैरवापराची प्रकरणेही वाढत आहेत. ऑनलाइन फसवणुकीत सायबर गुन्हेगार कोणाच्या तरी आधारचा गैरवापर करून गुन्हे करत आहेत.

म्हणूनच, आता तुम्ही तुमच्या आधार कार्डाबाबत जास्त काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा इतर कोणतीही माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. यासोबतच आधार कार्डची हिस्ट्री वेळोवेळी जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून कोणी त्याचा गैरवापर तर करत नाही ना हे कळू शकेल. बनावट आधार कार्ड बनवून अनेकांना बनावट आधार कार्डही देण्यात आली आहेत. त्यामुळेच आपले आधार कार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घेणेही खूप महत्त्वाचे आहे.

तुमच्याकडे असलेले आधार कार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घेणे खूप सोपे आहे. UIDAI आधारची माहिती ऑनलाइन मिळवण्याची सुविधा देते. तुमचे आधार खरे आहे की बनावट हे तुम्ही घरबसल्या आरामात ऑनलाइन तपासू शकता.

अशा प्रकारे आहे संपूर्ण प्रक्रिया
सर्व प्रथम UIDAI आधारित वेबसाइट https://uidai.gov.in वर जा.
आता My Aadhar सेक्शनमधील Aadhar Services वर जा.
येथे Aadhar Verification टॅबवर क्लिक करा.
हे तुम्हाला वेगळ्या पेजवर घेऊन जाईल.
या पेजवर तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यात तुमचा आधार क्रमांक टाका. तसेच, कॅप्चा देखील या पेजवर दिसेल, तो बॉक्समध्ये एंटर करा.
हे दोन टाकल्यानंतर Proceed आणि Verify Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक बरोबर असल्यास एक नवीन पेज उघडेल. यामध्ये तुमचा आधार क्रमांक दिसेल. यासह, तुम्हाला काही डिटेल्स देखील दिसतील.
जर तुमचा आधार क्रमांक खोटा असेल तर हे पेज उघडणार नाही आणि इनव्हॅलिड आधार क्रमांक लिहिलेला दाखवला जाईल.
जर तुमचे आधार कार्ड बनावट निघाले तर तुम्ही त्याबद्दल तक्रार देखील करू शकता.
आधारशी लिंक केलेला कोणताही टोल फ्री क्रमांक 1947 या क्रमांकावर करता येतो.

Leave a Comment