नवी दिल्ली । ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.जेव्हा लोकं अनेकदा नोकऱ्या बदलतात तेव्हा त्यांना भविष्य निर्वाह निधी बॅलन्स ट्रान्सफर करण्यात अडचणी येतात. काही वेळा लोकं ट्रान्सफर करून घेत नाहीत. मात्र ट्रान्सफर होणे गरजेचे आहे हे कळल्यावर ते अस्वस्थ होतात. पण आता हे काम खूप सोपे झाले आहे. तुम्ही तुमचे EPF ट्रान्सफर घरबसल्या ऑनलाइन करू शकता.
पीएफ खाते सहजपणे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यासाठी EPFO ने 6 सोप्या स्टेप्स दिल्या आहेत. EPFO ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्हिडिओची लिंक शेअर करून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. ही माहिती आम्ही येथे देत आहोत-
ऑफिसला जाण्याची गरज नाही
EPFO ने सांगितले आहे की, जर कोणाला त्याचे PF खाते ऑनलाइन ट्रान्सफर करायचे असेल तर ते आता करू शकतात. आता कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जुन्या किंवा नवीन मालकाच्या ऑफिसमध्ये फेऱ्या मारण्याची गरज नाही.
EPFO सदस्य पोर्टलद्वारे PF ट्रान्सफर कसा करावा ?
<<EPFO च्या सदस्य पोर्टलवर लॉग इन करा – http://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ त्यात लॉग इन करण्यासाठी तुम्हाला UAN आणि पासवर्ड आवश्यक असेल.
<<आता तुम्हाला Online Service वर जाऊन One Member One Account (Transfer Request) वर क्लिक करावे लागेल.
<<सध्याच्या एम्प्लॉयमेंटसाठी तुम्हाला PF Account आणि Personal Information व्हेरिफाय करावी लागेल.
<<Get Details वर क्लिक करा. याद्वारे जुन्या एम्प्लॉयमेंटची सविस्तर माहिती तुमच्यासमोर येईल.
<<फॉर्म अटेस्ट करण्यासाठी, आता तुम्हाला Previous Employer किंवा Current Employe निवडावे लागेल.
<<UAN मध्ये तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP मिळवण्यासाठी Get OTP वर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
<<तुम्ही फॉर्ममध्ये निवडलेल्या रिक्रूटर किंवा एम्प्लॉयरने अटेस्ट केल्यानंतर EPFO तुमचे EPF खाते ऑनलाइन ट्रान्सफर करेल. यानंतर, तुम्ही आणि तुमचा नवीन एम्प्लॉयर किंवा रिक्रूटर तुमच्या त्याच EPF खात्यात EPF टाकू शकता.