Diwali Recipe: बेसनाचे लाडू बनवण्याची जाणून घ्या परफेक्ट पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी सण म्हणला की फराळ आलेच. दिवाळी फराळामध्ये अनेक विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. परंतु या सगळ्यात सर्वांच्या आवडीचा असतो तो म्हणजे बेसनाचा लाडू. खायला चविष्ट असणारा बेसनाचा लाडू दिवाळीत हमखास बनवला जातो. परंतु अनेकवेळा हा बेसनाचा लाडू व्यवस्थित बनला जात नाही. काही वेळा तो तू कट होतो तर काही वेळा कडक होतो.. त्यामुळे आज आपण बेसनाच्या लाडूची अशी परफेक्ट पद्धत जाणून घेणार आहोत जी तुम्हाला कायम लक्षात राहील.

बेसन लाडू बनवण्याची पद्धत

बेसन लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम अर्धा किलो हरभऱ्याची डाळ हलकी भाजून घ्या. यानंतर या डाळीला एकदम बारीक पिठासारखे दळून आणा. आपल्याला अर्धा किलो डाळीसाठी 400 ग्रॅम पिठीसारखर आणि दीडशे ग्रॅप तूप लागेल. यामध्ये तुपाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते.

डाळ बारीक दळल्यानंतर तयार झालेले बेसन एका गोल मोठया कढईत भाजून घ्या. त्यात तूप घाला. या तुपामध्ये बेसनाचे पीठ व्यवस्थित भाजून घ्या. बेसन भाजताना तुपाचा अंदाज व्यवस्थितपणे घ्या. अशा पध्दतीने बेसन मंच आचेवर खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.

एकंदरीत 10 ते 15 मिनिटांनी बेसन तूप शोषून घेईल. यानंतर पुन्हा बेसन व्यवस्थित भाजा. यादरम्यान चमच्याने बेसन ढवळत रहा. यामुळे बेसन परफेक्ट भाजून निघेल. या प्रक्रियेनंतर ह्या बेसनामध्ये थोडं दूध घालून शिजवून घ्या. असे केल्यास बेसन छान रवाळ होईल.

यानंतर गॅस बंद करून बेसन एका ताटात काढून घ्या. हे मिश्रण सेट व्हायला थोडा वेळ लागेल. यानंतर बेसनाचे पीठ एकजीव करून घ्या. हे करत असताना यामध्ये तुमच्या अंदाजानुसार गोडीप्रमाणे पिठीसाखर घाला आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे एकत्र करा. यावेळेस बेसनमध्ये वेलची पावडर देखील घाला.

वेलची पावडर आणि पिठीसाखर बेसनामध्ये व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर लाडू वळण्यास सुरुवात करा. लाडू जर नीट वळले जात नसतील तर त्यामध्ये थोडेसे दूध घालू शकता. तुमचे लाडू वळून झाल्यानंतर लाडूंवर बदाम किंवा काजू चिटकवा. अशा पद्धतीने दिवाळीतील बेसनाचे लाडू तयार होतील.