मुंबई प्रतिनिधी | महिन्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधनसभेच्या कामाला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीला भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. अशा राजकीय परिस्थितीत , लोकसभेपेक्षाही मोठा भाजपला मोठा विजय मिळेल असा विश्वास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वसंतस्मृती येथे भाजपची महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री कोणाचा हे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आधीच ठरले आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची सदस्य नोंदणी हाती घेण्यात आली असून सदस्य नोंदणीत उच्चांक गाठावा, असा निर्धार करण्यात आला आहे असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
राज्यात शेतकरी आत्महत्या ही अत्यंत शरमेची गोष्ट असून त्या रोखण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहेत असे रावसाहेब दानवेंनी म्हणले आह. गेल्या काही दिवसांपासून राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोणाचा यावर चर्चा रंगली होती. आज त्या चर्चेला विराम मिळाला असून पुढचा मुख्यमंत्रीही भाजपचाच राहणार असे आज मुखयमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत सांगण्यात आले.