हॅलो Health । लिंबू रोजच्या आहारातील फळ आहे. लिंबू जितके आंबट असते तितकेच ते आरोग्यवर्धक असते. आरोग्याच्या अनेक समस्या लिंबाच्या सेवनाने दूर होतात. लिंबामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न सामावलेले असतात. लिंबू आरोग्यासाठी वरदान आहे. लिंबू पाण्यासोबत सेवन करनेच फायदेशीर आहे. कोमट पाण्यासोबत लिंबाचे सेवन करणे शरिराला फायदेशीर ठरते. बऱ्याच जणांना लिंबू मीठ लावून खाण्याची सवय असते. ती शरीरासाठी अत्यंत अपाय कारक आहे कारण लिंबू आणि मिठाच्या एकत्रित सेवनाने तुमच्या दाताला हानी पोचण्याचा संभव असतो. सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिल्याने तुमच्या आरोग्याला हे वरदानच ठरेल. परंतु लिंबू पाणी पिल्या नंतर १५ मिनिटे आपण अन्य कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये म्हणजे लिंबू पाणी पिल्याचे फायदे होतील.
लिंबू पाणी शरीरात चैतन्य वाढवते
लिंबू पाणी पिल्याने शरीरात चैतन्य निर्माण होते. लिंबू पाणी पिल्याने अनावश्यक करपट ढेकरा कमी होण्यास मदत होते. शरीराची ऊर्जा वाढवून नैराश्य कमी करण्यासाठी लिंबू पाणी मदत करते.
रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते
लिंबात व्हिटॅमीन सी मुबलक प्रमाणात असते आणि व्हिटॅमीन सी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. लिंबू पाणी पिल्याने व्हिटॅमीन सी वाढण्यास मदत होते. आपण जेव्हा तणावाने आजारी पडतो तेव्हा आपल्या शरीरातील व्हिटॅमीन सी कमी पडते म्हणून लिंबू पाणी हे नैसर्गिक रित्या शरीराला व्हिटॅमीन सी पुरवते.
पचनशक्तीसाठी लाभदायक
सकाळी लिंबू पाणी पिल्याने आतड्यात साठलेले टॉक्सिन्स कमी होते. त्यामुळे पचन क्रिया सुधारते.स्वच्छाला साफ होत नसल्यास लिंबू पाण्याचे सेवन अवश्य करावे जेणे करून पोट साफ होण्यास फायदा होईल.लिंबूपाण्याचे नियमित सेवन ऍसिडिटी कमी करण्यास मदत करते.
त्वचा तजेल दिसू लागते
लिंबू पाणी पिण्याने त्वचा तजेल बनते. लिंबात अॅन्टीऑक्सीडंटसमुळे त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.