हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC ही देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. एलआयसीकडून देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. आज आपण एलआयसीच्या एका अशा प्लॅनबाबतची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याअंतर्गत आपल्याला 1 कोटी रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकेल. हे लक्षात घ्या कि, एलआयसीकडून सर्व स्तरातील लोकांना लक्षात घेऊन पॉलिसी तयार केली जाते. Jeevan Shiromani ही देखील त्यापैकीच एक पॉलिसी आहे. या नॉन लिंक्ड प्लॅन अंतर्गत कव्हर आणि सेव्हिंग या दोन्हींचा लाभ मिळतो. तसेच यामध्ये कमीत कमी 1 कोटी रुपयांची गॅरेंटी देखील मिळते.
जास्त उत्पन्न असलेल्या लोकांसाठी खास ही योजना तयार करण्यात केली गेली आहे. या पॉलिसी अंतर्गत जर एखाद्या पॉलिसीधारकाचा मुदतपूर्तीआधीच मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाईल. हा एक मर्यादित प्रीमियम मनी बॅक प्लॅन देखील आहे. यामध्ये वेळोवेळी पैसे मिळतात. तसेच या पॉलिसीमध्ये गुंतवणुकीचे कमाल वय 55 वर्षे (पॉलिसी टर्म 14 वर्षे), 51 वर्षे (पॉलिसी टर्म 16 वर्षे), 48 वर्षे (पॉलिसी टर्म 18 वर्षे) आणि 45 वर्षे (पॉलिसी टर्म 20 वर्षे) आहे.
किती गुंतवणूक करावी लागेल ???
LIC च्या या Jeevan Shiromani पॉलिसीमध्ये बेसिक सम एश्योर्ड एक कोटी रुपये आहे. तसेच यासाठी ग्राहकाला चार वर्षे गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतरच रिटर्न दिला जाईल. यामध्ये ग्राहकांना दरमहा सुमारे 94,000 रुपये जमा करावे लागतील. तसेच या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास ठराविक कालावधीमध्ये पेमेंट करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. याशिवाय मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कमही दिली जाईल. याशिवाय या योजनेमध्ये गंभीर आजारांसाठी देखील कव्हर दिले जाईल. तसेच त्यामध्ये 3 पर्यायी रायडर्सही उपलब्ध असतील.
पॉलिसी धारकांच्या हयातीवर निश्चित पेमेंट केले जाते त्याला सर्व्हायव्हल बेनिफिट असे म्हणतात, जे खालीलप्रमाणे आहे: –
– 14 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 10व्या आणि 12व्या वर्षांमध्ये विमा रकमेच्या 30%.
– 16 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 12व्या आणि 14व्या वर्षात विमा रकमेच्या 35%.
– 18 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 14व्या आणि 16व्या वर्षांत विम्याच्या रकमेच्या 40%.
– 20 वर्षांच्या पॉलिसीमध्ये 16व्या आणि 18व्या वर्षात विमा रकमेच्या 45%.
किती कर्ज मिळू शकेल ???
या पॉलिसीच्या मुदतीदरम्यान, ग्राहक LIC च्या अटी आणि नियमांच्या अधीन राहून पॉलिसीच्या सरेंडर व्हॅल्यूवर कर्ज घेऊ शकेल. तसेच हे पॉलिसी लोन वेळोवेळी ठरलेल्या व्याजदरावर उपलब्ध असेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Insurance-Plan/LIC-s-Jeevan-Shiromani-(Plan-No-947,-UIN-512N315V0
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ