हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC : जर आपण गुंतवणूकीसाठी सुरक्षित आणि चांगला रिटर्न देणाऱ्या प्लॅनच्या शोधात असाल तर LIC ची न्यू जीवन शांती योजना आपल्यासाठी योग्य ठरेल. ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. LIC च्या या योजनेमध्ये पॉलिसीधारकांना इमीडिएट आणि डिफरमेंट एन्युइटी सारखे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये एकरकमी पैसे गुंतवून आजीवन पेन्शन मिळते.
यासाठीची पात्रता जाणून घ्या
या योजनेमध्ये पॉलिसीधारकांना सुमारे नऊ एन्युइटी पर्याय निवडण्याची ऑफर दिली जाते. यामध्ये पॉलिसी सुरू झाल्यापासूनच वार्षिकी व्याजदर निश्चित केले जातात. जे आपल्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार निवडण्याचा पर्याय देखील मिळेल. तसेच या योजनेमध्ये कमीत कमी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर आपल्याला ही योजना आवडली नाही तर ती सरेंडर देखील करता येईल. यामध्ये गुंतवणुकीचे किमान वय 30 वर्षे आणि गुंतवणुकीचे कमाल वय 79 वर्षे आहे. तसेच किमान स्थगिती अधिक 1 वर्ष आणि कमाल 12 वर्षे आहे.
अशा प्रकारे करता येईल गुंतवणूक
LIC च्या या योजनेमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने गुंतवणूक करता येते. ही पॉलिसी ऑनलाइन खरेदी करण्यासाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्याचप्रमाणे ही पॉलिसी ऑफलाइन खरेदी करण्यासाठी जवळच्या एलआयसी एजंटकडे जावे लागेल. त्यांच्यामार्फत किंवा एलआयसी शाखेला भेट देऊन पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता येईल.
10 लाख रुपये गुंतवल्यावर किती पैसे मिळतील ???
जर 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे वयाच्या 45 व्या वर्षी हा प्लॅन सुरु केला आणि 12 वर्षांचा डिफरमेंट पिरियड ठेवला तर 12 वर्षांनंतर वार्षिक 1,20,700 रुपये मिळू लागतील.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/Products/Pension-Plans/LIC-s-New-Jeevan-Shanti-(Plan-No-858)-(UIN-512N338
हे पण वाचा :
Car कंपन्यांकडून कार खरेदीवर दिली जाते आहे लाखो रुपयांची सवलत, जाणून घ्या यामागील कारणे
Business Idea : हमखास कमाई मिळवून देणार ‘हा’ व्यवसाय, कसा सुरू करावा ते जाणून घ्या
BSNL च्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनमध्ये डेटासोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग
Bank Holidays : जानेवारीमध्ये इतके दिवस बँका राहणार बंद, इथे पहा लिस्ट
Jio कडून नवीन वर्षासाठी धमाकेदार रिचार्ज प्लॅन लाँच, जाणून घ्या अधिक तपशील