LIC Policy : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) नेहमीच ग्राहकांना विविध प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करत असते. सध्या एलआयसीची जीवन लाभ ही पॉलिसी ग्राहकांच्या चांगलीच पसंतीत पडत आहे. ही विमा पॉलिसी सुरक्षितेसह चांगली बचत योजना देखील देत आहे. ज्यामुळे या पॉलिसीसाठी ग्राहकांची आवड वाढताना दिसत आहे. कंपनीने या पॉलिसीअंतर्गत अनेक फायदे ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
या पॉलिसी अंतर्गत जर तुम्ही दर महिन्याला ७,५७२ रुपये जमा केले तर तुम्हाला मुदतपूर्तीच्या वेळी ५४ लाख रुपये मिळतात. तसेच इतर गोष्टींचा लाभ देखील या पॉलिसीमुळे ग्राहकांना होत आहे. या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ५९ वर्ष इतकी असणे गरजेचे आहे. या वयोमर्यादेच्या पुढील व्यक्तीला पॉलिसीचा लाभ घेता येत नाही. (LIC Policy)
जर एखाद्या २५ वर्षांच्या व्यक्तीला या पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला २५ वर्षाच्या कालावधीत ७४०० रूपये किंवा २४६ रूपये भरावे लागणार आहेत. तर एका वर्षासाठी ८६९५४ रुपये असतील. यामध्ये ग्राहकाला रिव्हर्शनरी बोनस आणि त्या अतिरिक्त बोनस देखील मिळू शकतो. परंतु कंपनी एका कालावधीनंतर बोनस दर बदलत राहते. याचा परिणाम मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या बोनसवरही होतो.
मुख्य म्हणजे, या विमा योजनेचा लाभ लहान मुलांसाठी देखील घेता येऊ शकतो. या विमा योजनेत ८ ते ५९ वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात. ही पॉलिसी १०, १३, १६ वर्षांच्या कालावधीसाठी घेतली जाऊ शकते. या पॉलिसीचे हे सर्व फायदे बघून अनेकांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे.
दरम्यान एलआयसीची (LIC Policy) जीवन लाभ पॉलिसीअंतर्गत गुंतवणूकदार त्यांच्या आवडीनुसार प्रीमियमची रक्कम ठरवू शकतो. जर पॉलिसीधारक मॅच्युरिटीपर्यंत जिवंत राहिला तर त्याला मॅच्युरिटी तसेच विमा रक्कम, बोनस आणि इतर अनेक फायदे मिळतात. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीलाही बोनससह मृत्यूचा लाभ मिळतो. त्यामुळे ही पॉलिसी गुंतवणूक करण्यासाठी जास्त फायदेशीर ठरत आहे.