नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करतो. मात्र निसर्गाच्या कोमल स्वरूपाच्या मागे आणखी एक भयंकर रूप देखील आहे, जे आपल्याला एका क्षणात नष्ट करू शकते. अनेकवेळा पाऊस सुरू असताना झाडाखाली उभा राहू नका, असा सल्ला जातो. कारण वीज (lightning strike) आधी झाडांवर पडते. याचा पुरावा म्हणून सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वीज (lightning strike) थेट झाडावर पडताना दिसत आहे. वंडर ऑफ सायन्स नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
This is why you should never stand under a tree during a storm.
Credit: tomasgesu/TikTokpic.twitter.com/cf1VBIp9Gq
— Wonder of Science (@wonderofscience) June 13, 2022
या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये झाडावर वीज (lightning strike) पडताना दिसत आहे. हे दृश्य इतकं भयावह आहे, की पाहूनच कोणालाही घाम फुटेल. पाऊस पडत असताना झाडांजवळ उभे राहू नये असा सल्ला का दिला जातो, याचे उत्तर तुम्हाला व्हिडिओ पाहून मिळेल. काचेच्या खिडकीतून हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.
बाहेर पाऊस पडत आहे आणि समोर एक झाड दिसत आहे. अचानक डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत झाडावर प्रचंड वेगाने वीज (lightning strike) पडताना दिसते. ही घटना इतकी भयानक आहे की व्हिडिओ पाहून तुमचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. अगदी काहीच क्षणात हे संपूर्ण झाड आगीच्या रुपात बदलल्यासारखं दिसू लागतं. यावेळी या झाडाखाली कोणी उभा असतं तर त्याचा मृत्यू निश्चित झाला असता.
हे पण वाचा :
पी चिदंबरम यांना पोलिसांकडून धक्काबुक्की, गंभीर दुखापत
मोदी सरकारची मोठी घोषणा!! 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले कि…
लाखोंची नोकरी सोडून सुरू केले गाढवांचे फार्म; आता झालाय मालामाल