राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दिल्ली दरबारी रोज वरिष्ठ राजकीय मंडळींच्या बैठका या होत आहेत. राष्ट्रपतीपदासाठी अनेक नेत्याची नावेही चर्चेत आहेत. तर महाराष्ट्रातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्र्पती पदाच्या शर्यतीत आपण राहणार नसून राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवारही असणार नाही, असे पवार यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. दरम्यान काल राष्ट्रपतिपदाबाबत मुंबईत राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शरद पवार म्हणाले की, “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही. त्यामुळे मला गृहीत धरू नये, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने 18 जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया 21 जुलै रोजी पार पडणार आहार. महाराष्ट्रात मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे.

Leave a Comment