Shinzo Abe प्रमाणेच ‘या’ मोठ्या नेत्यांची देखील केली गेली हत्या !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Shinzo Abe : काल म्हणजेच शुक्रवारी 8 जुलै रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची एका निवडणूक प्रचारादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संशयित मारेकरी घटनास्थळीच पकडला गेला. या हत्येनंतर जगभरात शोककळा पसरली आहे. यावरूनच जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांच्या अशाच प्रकारच्या हत्यांच्या घटनांची देखील आठवण झाली. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

The brave jawans who liberated Bangladesh | Mint

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांना ‘आयर्न लेडी’ म्हणूनही ओळखले जात. 31 ऑक्टोबर 1984 रोजी सकाळी इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. दिल्लीतील सफदरजंग रोडवरील त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना इंदिरा गांधी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला. Shinzo Abe

Rajiv Gandhi and the story of Indian modernization | Mint

इंदिरा गांधींनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांना पंतप्रधान बनवण्यात आले. त्यांनी 1989 पर्यंत पंतप्रधान पद सांभाळले. मात्र 21 मे 1991 रोजी तामिळनाडू मधील श्रीपेरुंबदुर येथील एका निवडणूक रॅलीदरम्यान एका महिला आत्मघाती बॉम्बरने राजीव गांधी यांची हत्या केली होती. Shinzo Abe

TIME for Kids | Abraham Lincoln

अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे 16 वे अध्यक्ष होते. अमेरिकेच्या गृहयुद्धादरम्यान त्यांनी देशाचे खंबीरपणे नेतृत्व केले. मात्र 14 एप्रिल 1865 रोजी अब्राहम लिंकन यांची एका इसमाकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. वॉशिंग्टनमधील एका थिएटरशी संबंधित जॉन विल्क्स बूथ याने हा हल्ला केला होता. Shinzo Abe

कैनेडी सिद्धांत इतिहास देखें अर्थ और सामग्री - hmoob.in

22 नोव्हेंबर 1963 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची डल्लास येथे हत्या करण्यात आली. मात्र या हत्येमागच कोडं अजूनही सुटू शकलेलं नाही. या हत्येमागे त्यांची अमेरिकेत वाढत चाललेली प्रसिद्धी असल्याचंही बोललं जातं आहे. Shinzo Abe

हमें उन सब को मारना ही था' - BBC News हिंदी

15 ऑगस्ट 1975 रोजी बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती असलेले बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची जवळपास संपूर्ण कुटुंबासह ढाका येथे हत्या करण्यात आली. बांगलादेश आर्मी वाहिनीच्या तरुण गटाने पहाटे हे हत्याकांड केले. या हत्याकांडानंतर मुजीबच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले खंडकर मुश्ताक अहमद यांना अध्यक्ष करण्यात आले. हा तेथील सत्तापालटाचा एक पूर्वनियोजित भाग होता. Shinzo Abe

Birthday spl : Former PM Benazir Bhutto death mystery secrets | बर्थडे  स्पेशल : पाकिस्तानी पूर्व प्रधानमंत्री बेनेजीर भुट्टो की मौत से जुड़े ये 10  रहस्य आज भी हैं ...

27 डिसेंबर 2007 रोजी, रावळपिंडीतील एका राजकीय सभेनंतर आत्मघातकी बॉम्ब आणि तोफगोळ्यांसह दुहेरी हल्ल्यात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या करण्यात आली. बेनझीर या कोणत्याही मुस्लिम देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि दोनदा निवडून आलेल्या पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान होत्या. त्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या प्रतिनिधी आणि मुस्लिम धर्माच्या शिया शाखेच्या अनुयायी होत्या. Shinzo Abe

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://en.wikipedia.org/wiki/Shinzo_Abe

हे पण वाचा :

Share Market : गेल्या 3 दिवसांत गुंतवणूकदारांना झाला 6.30 लाख कोटी रुपयांचा फायदा !!!

Bank FD : आता ‘या’ बँकेच्या FD वर मिळणार जास्त व्याज, नवे दर तपासा

LPG दर वाढीमुळे बिघडले सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजट !!!

RBI ने ‘या’ को-ऑपरेटिव्ह बँकेवर घातली बंदी, यामागील कारण जाणून घ्या

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू

Leave a Comment