Wednesday, October 5, 2022

Buy now

सोशल मीडिया फीड्सप्रमाणे आपल्या मेंदूलाही अपडेट होण्यासाठी थोडा वेळ लागतो

नवी दिल्ली । एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच आपला मेंदू सतत समृद्ध आणि व्हिज्युअल उत्तेजना (visual stimuli) अपलोड करत असतो. या कारणास्तव, रिअल टाइममध्ये नवीन इमेज पाहण्याऐवजी, आपण जुन्या इमेज पाहतो, कारण आपला मेंदू सुमारे 15 सेकंदात रिफ्रेश होतो. अमेरिकेतील कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासातून आपल्या मेंदूमध्ये निर्माण होत असलेल्या चित्रांचीसतत सुसंगतता (continuous harmony) आणि त्याच्या स्थिरतेबद्दल अधिक माहिती मिळू शकते.

यूसी बर्कले येथील मानसशास्त्र, न्यूरोसायन्स आणि व्हिजन सायन्सचे प्रोफेसर आणि या अभ्यासाचे ज्येष्ठ लेखक डेव्हिड व्हिटनी यांनी सांगितले की,”जर आपला मेंदू रिअल टाइममध्ये अद्ययावत होऊ लागला, तर सावली, प्रकाश आणि हालचालींच्या चढउतारांच्या बाबतीत हे जग नेहमीच एक भ्रमित स्थिती अनुभवेल.” या अभ्यासाचा निष्कर्ष Science Advances या जर्नल मध्ये प्रकाशित झाला आहे.

तज्ञ काय म्हणतात ?
या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि स्कॉटलंडच्या अबरडीन विद्यापीठातील मानसशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक आणि यूसी बर्कले येथील व्हिटनी लॅबमधील पोस्टडॉक्टरल फेलो मौरो मानस यांनी सांगितले की,”आपला मेंदू हा टाइम मशीनसारखा आहे. तो आपल्याला वेळेत परत पाठवत राहतो. हे असे आहे की आपल्याकडे एक अ‍ॅप आहे जे आमचे व्हिज्युअल इनपुट दर 15 सेकंदांनी एका इंप्रेशनमध्ये एकत्रित करते जेणेकरून आपण दैनंदिन जीवन हाताळू शकू.”

अभ्यास कसा झाला?
संशोधकांनी त्या यंत्रणेच्या आधारे यासाठी काही प्रयोग केले, कारण सिनेमातील अभिनेता आणि त्याचा डबल स्टंट कलाकार यांच्यातील फरक लोकांना समजत नाही. संशोधनासाठी 100 सहभागींचा समावेश करण्यात आला होता. त्यांचे वय आणि लिंग यावर आधारित चेहरे बदलून त्यांना 30 सेकंदांच्या कालावधीत व्हिडिओ दाखवण्यात आले.

या व्हिडिओमधील इमेज डोक्यावर किंवा चेहऱ्यावरील केस दाखवत नाहीत, मात्र त्यांना काही अंदाज देण्यासाठी फक्त डोळे, नाक, हनुवटी, तोंड आणि घसा दिसत आहेत. जेव्हा त्यांना चेहरे ओळखण्यास सांगितले गेले तेव्हा बहुतेक सहभागींनी अर्ध्या व्हिडिओमध्ये पाहिलेली फ्रेम कॅप्चर केली. शेवटची नाही, जी त्यांच्या मेंदूत अपडेट केलेली इमेज होती. विटनीच्या म्हणण्यानुसार, या आधारावर कोणीही म्हणू शकतो की आपला मेंदू उशिराने काम करतो.