पॅन अपडेट करण्यासाठी लिंक ओपन केली अन् दिड लाख रुपये झाले गायब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एका मोबाईल क्रमांकावरून कोणतेही ऑनलाइन व्यवहार होत नव्हते. तुमचे एसबीआय बँकेचे योनो ॲप ब्लॉक झाले आहे. ते सुरू करण्यासाठी पॅन नंबर अपडेट करावा लागेल. त्यासाठी एका लिंक वर जा त्या लिंक वर गेल्यानंतर योनो ॲपचा युजर आयडी आणि पासवर्ड टाका असे मेसेज आले, संबंधिताने ते करताच दोन वेळा अकाउंट मधून एक लाख 57 हजार 301 रुपये गेल्याचे मेसेज आले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सिटी चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यभान मुरकुटे (रा. हडको) हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. ते 21 जानेवारी रोजी एन-12 येथील स्टुडिओत काम करत होते. त्यांचा एक मोबाईल क्रमांक लॉक झाला होता. त्यावरून कोणतेही ऑनलाइन व्यवहार होत नव्हते. तेव्हा त्यांच्या एसबीआय बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज आला. त्या मेसेजमध्ये तुमचे योनो अकाउंट ब्लॉक झाले आहे. त्यासाठी तुम्हाला पण अपडेट करावे लागेल. अपडेट करण्यासाठी एक लिंक देण्यात आली. या लिंक वर मुरकुटे यांनी क्लिक करून पेन अपडेट करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना एसबीआय योनो ॲपचा युजर आयडी व पासवर्ड मागण्यात आला. त्यांनी तो टाकल्यानंतर पहिल्यांदा 25 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यातून वजा झाले. त्यानंतरही त्यांनी दुसऱ्यांदा युजर आयडी व पासवर्ड टाकला तेव्हा एक लाख 32 हजार 301 रुपये गेले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुरकुटे यांनी बँकेला मेल करून योनो, योनो लाइट हे दोन्ही अकाउंट व डेबिट कार्ड बंद केले. यानंतर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर 16 एप्रिल रोजी सिटी चौक ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास निरीक्षक अशोक भंडारे करत आहेत.

Leave a Comment