धक्कादायक ! मध्यरात्री मैत्रिणीला हायवेवर सोडून गेला मित्र; नराधमांनी केला गँगरेप

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. अशामध्ये जयपुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री हि घटना घडली आहे. रविवारी रात्री कारमधील दोन बदमाशांनी हॉटेलमधून पार्टी करून परत येणाऱ्या 22 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. तिला बळजबरीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांनी पीडित मुलीला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर पीडितेने तेथे राहणाऱ्या लोकांच्या मदतीने भांकरोटा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मित्राने तिला वाटेत एकटे सोडले
पीडित मुलगी आपल्या मित्रांसह सी स्कीम येथील अहिंसा सर्कलजवळील हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. इथे तिने मित्रांसह मद्यपान पार्टी केली. यानंतर रात्री अडीचच्या सुमारास मित्र रक्षितने तिला काही कामानिमित्त भांकरोटा येथे जायचे आहे असे सांगितले. त्यानंतर ते दोघे भांकरोटाच्या दिशेने गेले. पण त्यानंतर 200 फूट अंतरावर जाऊन त्या दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर रक्षित तिला हायवेवर सोडून निघून गेला. तिथे असणारे दोन तरुण त्यांचे भांडण ऐकत होते, जेव्हा मुलीचा मित्र तिथून निघून गेला, तेव्हा नराधमांनी मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

हॉटेलमध्ये लॉकडाऊनमध्ये पार्टी, पोलिसांच्या कामकाजावर प्रश्न?
जयपूरमध्ये ही सामूहिक बलात्काराची घटना घडल्यामुळे लोकांना मोठा धक्का बसला आहे. तसेच हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे कि कोरोना महामारीमुळे राज्यात कडक बंदोबस्त असूनही, रात्री 2 वाजेपर्यंत कोणतेही रेस्टॉरंट कसे उघडे होते. तसेच शहरात रात्री उशिरा नाकाबंदी करण्यात आली असतानाही पोलिसांनी त्यांना कुठेही रोखले नाही. त्याचबरोबर रात्री उशिरा पोलिस गस्त घालूनही बलात्काराची घटना कशी घडली ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.