Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील बहुतांश बँकांकडून चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड देत आहेत. यासोबतच क्रेडिट कार्ड घेण्याची प्रक्रिया सोपी देखील करण्यात आली आहे. तसेच यावर अनेक आकर्षक ऑफर्स मिळत असल्यामुळे लोकांकडूनही मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होऊ लागला आहे. आता तर डिजिटल पेमेंटसाठी UPI व्यतिरिक्त, Mobikwik, Amazon Pay Paytm आणि PhonePe सारख्या ई-वॉलेटचा वापरही होऊ लागला आहे.

अनेक लोकं Credit Card ने ई-वॉलेटमध्ये पैसे जोडतात आणि नंतर ते छोट्या पेमेंटसाठी वापरतात. आता तर ई-वॉलेटद्वारे पेमेंट करण्यासाठी ओटीपी किंवा पिन पुन्हा पुन्हा एंटर करण्याची आवश्यकता नाही. एका अर्थाने ते सोयीचे मानले जाते आहे.

How to Add a Credit/Debit Card to Paytm? | Paytm Blog

याचे फायदे काय आहेत ???

हे जाणून घ्या कि, Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट्स देखील मिळतात. याशिवाय, रीपेमेंटसाठी सुमारे 45 दिवस मिळतात, ज्यासाठी कोणतेही व्याज द्यावे लागत नाही. तसेच, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डांवर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खर्च केल्यानंतर वार्षिक मेन्टनन्स फी देखील परत केली जाते. याशिवाय अनेकदा क्रेडिट कार्डद्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे जोडण्यासाठी कॅशबॅक देखील मिळतो.

याचे नुकसान काय ???

मात्र Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे जोडण्यासाठी अतिरिक्त शुल्क देखील द्यावे लागेल. उदाहरणार्थ जर आपण ई-वॉलेटमध्ये 100 रुपये जोडले तर 2-5 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकेल.

Paytm begins charging 2% fee on loading=

Paytm मध्ये किती शुल्क द्यावे लागेल ???

Paytm च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, Credit Card द्वारे पेटीएम वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी 2.5 टक्के शुल्क आकारले जाईल. तसेच, अमेरिकन एक्सप्रेस, कॉर्पोरेट कार्ड किंवा प्रीपेड कार्ड वापरून वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यावर 3% शुल्क आकारले जाईल. तसेच जे ग्राहक क्रेडिट, कॉर्पोरेट किंवा प्रीपेड कार्ड वापरून वॉलेटमध्ये पैसे जोडतात आणि प्रति महिना 5,000 रुपये किंवा त्याहून जास्त रकमेच्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात त्यांना 2 टक्क्यांपर्यंतचा सरचार्ज लागू होईल.

PhonePe मध्ये किती शुल्क द्यावे लागेल ???

क्रेडिट कार्डद्वारे PhonePe वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यासाठी 2.65 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

Mobikwik वर किती शुल्क द्यावे लागेल ???

क्रेडिट कार्डद्वारे दर महिन्याला Mobikwik वॉलेटमध्ये 2500 रुपये जोडल्यास यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.

Pros and Cons of Credit Cards - Experian

Amazon Pay वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे करता येत नाही

Amazon Pay वॉलेट या ई-कॉमर्स कंपनीच्या पेमेंट युनिटमध्ये Credit Card द्वारे पैसे लोड करण्याची सुविधा आता थांबवण्यात आली आहे. मात्र यामध्ये आपल्याला डेबिट कार्ड, नेटबँकिंग आणि UPI द्वारे पैसे लोड करता येतील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://paytm.com/blog/payments/mobile-wallet/how-to-add-money-to-paytm-wallet-through-credit-card/

हे पण वाचा :
BSNL : फक्त 100 रुपयांच्या खर्चात वर्षभर बोला मोफत, सोबत डेटाही…
Credit Card ग्राहकांनी चुकूनही करू नयेत ‘या’ 3 चुका, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान
LIC ने लाँच केला जबरदस्त इन्शुरन्स प्लॅन, 15 दिवसांत विकल्या 50,000 पॉलिसी
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ
FD Rates : 102 वर्षे जुन्या बँकेने FD वरील व्याजदर वाढवले, ग्राहकांना मिळणार 8.50% पर्यंत रिटर्न