कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर
लॉक डाउनच्या काळातही जिल्ह्यात मद्य तस्करी सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या बारा दिवसांत जिल्ह्यात ६६ ठिकाणी कारवाई करून साडे आठ लाख रुपयांचे मद्य जप्त केले. मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या ३० जणांना अटक केली असून, चार वाहने जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.
करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ एप्रिलपासून देशभर संचारबंदी लागू केली आहे. या काळात राज्यात सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतूक बंद आहे. मात्र, या काळातही मद्याची चोरटी वाहतूक सुरूच आहे. गोव्यातून कोकणमार्गे कोल्हापूरात येणाऱ्या मद्यासह कर्नाटकातूनही मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्याची वाहतूक सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या १२ दिवसांत मद्य तस्करी आणि अवैध विक्री रोखण्यासाठी ६६ ठिकाणी धडक कारवाई केली.
या कारवाईत साडेआठ लाख रुपयांचे मद्य जप्त केले असून, ३० संशयितांना अटक केली. वाईन शॉपी आणि परमिट रूम बिअर बार बंद असल्याने देशी तसेच हातभट्टीची दारू जिल्ह्यात काही ठिकाणी तयार केली जात आहे. यावरही राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांकडून कारवाया केल्या जात आहेत. संचारबंदीच्या काळात मद्याची वाहतूक आणि विक्री करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर
१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी
मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर