हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात कोरोनाचा मुक्काम दिवसेंदिवस वाढतच आहे. या न बोलावलेल्या जीवघेण्या पाहुण्याला लवकरात लवकर महाराष्ट्रातून घालवण्यासाठी पोलीस, डॉक्टर, नर्स, प्रशासन जीवाचं रान करत आहेत. या कोरोनाने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढू नये म्हणून सरकारने राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. तो केवळ तुमच्या काळजीपोटी, तुमचा जीव जाऊ नये म्हणून. घराबाहेर पडू नका रे बाबांनो! असं म्हणून मायबाप सरकारचा घास कोरडा झालाय, तरीही काही महाराष्ट्र भूमीची उनाड लेकरं काम नसताना आपली फटफटी घेऊन घराबाहेर पडतच आहेत. अशा उनाड लेकरांना वठणीवर आणण्यासाठी अखेर पोलीस मामांनी त्यांना अद्दल घडवण्यासाठी थेट कारवाईला सुरुवात केली आहे.
लॉकडाऊन दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अडीच तासाचा अवधी देण्यात आला आहे. मात्र या काळामध्ये एका घरातील फक्त एकानेच घराबाहेर पडायचं असा आदेश असतानाही लोक सर्रास मोटरसायकलवर फिरताना पाहायला मिळत आहेत. अशाच लोकांच्या दुचाकी बीड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. बीड शहरामध्ये जवळपास ४०० दुचाकी वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.दुचाकी जप्त केल्यानंतर अनेकांना पायीच लांब अंतरावर असलेल्या घराची वाट धारावी लागली.
बीड जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सोडून इतर वाहनांना पेट्रोल बंदी सुद्धा करण्यात आली आहे. तरी सुद्धा लोक काही केल्या रस्त्यावर यायचं थांबत नाहीत आणि म्हणून आता पोलिसांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. तेव्हा विनाकारण घराबाहेर पडून नका नियम हे तुमच्या हितासाठीच आहेत हे लक्षात ठेवा. अन्यथा रस्त्यावर पूर्णपणे वाहन न आणण्याचा कठोर निर्णय सरकारला घ्यावा लागेल. तेव्हा तुम्ही ऐन संकटात असू नये हीच प्रार्थना घराबाहेर गाडी घेऊन बाहेर पडताना करा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??
काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध
निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून
भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता