हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही माध्यमांनी परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा विचार रेल्वेकडून सुरु असल्याचे वृत्त दिले होते. त्यामुळं लॉकडाउनच्या काळात विविध शहरांमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील स्थलांतरित कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला असताना रेल्वेने या वृत्ताचे खंडन केलं आहे. लॉकडाउन संपेर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत विशेष ट्रेन सोडण्याचे कुठलेही नियोजन नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मंत्रालायने म्हटले की, “देशभरात सर्व प्रकारची प्रवासी रेल्वे सेवा ३ मे २०२० पर्यंत पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तसेच या दरम्यान विविध शहरांमधील स्थलांतरितांच्या झालेल्या गर्दीला त्यांच्या गावापर्यंत सोडण्यासाठी कोणत्याही विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा विचारही नाही.” रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयाने माध्यमांना आवाहन केले की, “या स्पष्टीकरणाची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच या संदर्भात कोणतीही चुकीची बातमी येणार नाही याची काळजी घेऊन आमची मदत करावी.”
It is clarified that all Passenger train services are fully cancelled, across the nation, till 3rd May 2020 and there is no plan to run any special train to clear the passenger rush
All concerned may pl.take note of the same and help us in resisting any wrong news in this regard
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 14, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलला देशातील लॉकडाउन पुन्हा ३ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. दरम्यान, काही माध्यमांनी परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा विचार रेल्वेकडून सुरु असल्याचे वृत्त दिले होते. त्याचा परिणाम म्हणून काल मंगळवारी वांद्रे स्टेशनवर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय स्थलांतरित कामगार एकत्र आले होते. यावेळी त्यांनी या लॉकडाउनला विरोधही दर्शवला आणि गावी जाण्यासाठी रेल्वे सोडण्याची मागणीही केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद
काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का
लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा
पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव
भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…