नाशिकमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील; उद्यापासून काय काय सुरु राहणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. मार्चपासून रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण पडत आहे. यामुळे संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. यामुळे बऱ्याच ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल १५ जून पर्यंत निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या शहरांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली असेल त्यांना अधिक शिथिलता देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

ज्या जिल्ह्यांमध्ये वा शहरांमध्ये पॉझिटिव्हिटी रेटनुसार आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना लागू करण्यात येणार आहे. नाशिकमधील जोईळ्या या ठिकाणची आढावा बैठक आज पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. या बैठकीत नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांहून कमी असल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सलून, कपड्याचे दुकान, सराफा दुकाने उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे. त्यांना नियमांचे पालन काटेकोरपणे करून सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहे.

काय काय सवलत देण्यात आली आहे ?
दुकाने सकाळी 7 ते 2 या वेळेत सुरू राहणार आहे.
7 ते 2 या वेळेत भाजीपाला विक्री सुरु राहणार आहे.
10 ते 2 वाजेपर्यंत शिवभोजन पार्सल सेवा सुरू राहणार आहे.
अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी असणार आहे.
दुपारी 3 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी बंदी लागू असणार आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही बाहेर पडण्यासाठी परवानगी नसणार आहे.
शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहणार आहेत.
बँक सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार आहेत.
15 जूनपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत.
सलून, कपड्याचे दुकाने, सराफ व्यावसायिकांची दुकाने उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे.

Leave a Comment