लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी केंद्राने केली ‘ही’ मोठी घोषणा; देशातील ८० कोटी लोकांना लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. मात्र, त्यानंतर करोनामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं काय? अशी विचारणा लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर उपस्थित करण्यात येत होती. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत यासाठी केंद्रानं पाऊल उचलत देशातील ८० कोटी लोकांना अल्प दरात धान्य देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार प्रति व्यक्तीला महिन्याला २ रुपये किलो दरानं गहू आणि ३ रुपये किलो दरानं तांदुळ पुरवण्याची व्यवस्था करण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. जगातील ही सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजना आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या १२२ वर; अशी आहे जिल्हावार करोनाबाधीत रुग्णांची संख्या

गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या

 

Leave a Comment