औरंगाबाद । लाॅकडाऊन काळात विनाकारण फिरणा-यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई केली जात असून, वाहनधारकांना जबर दंडाची शिक्षा केली जात आहे. शहरातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे.
कार्तिकी सिग्नल चौकात पोलीस उपायुक्त नितेश खाटमोडे पाटील, पीआय अमोल देवकर, पीएसआय अनिता बागुल, पोकाॅ योगेश नाईक, राजेश चव्हाण, पोहेकाॅ कडू, महिला काॅ. के. दौंड यांच्या पथकाने अनेक वाहनधारकांची कसून चौकशी केली. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लाॅकडाऊन नियमांचे पालन करत नसलेल्या अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईसोबत कलम 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहेत. अशीच कारवाई शहरातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत सुरु आहे. पोलीस आयुक्त डाॅ निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त श्रीमती मीना मकवाना, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर तैनात आहेत व विनाकारण फिरणा-यांवर कारवाई केली जात आहे.