आम्ही बोललो तर कुठून कुठून कळा येतील बघा” हसन मुश्रीफांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांबद्दल एकही वाईट वाक्य वापरले तर खपवून घेणार नाही. पवार साहेबांच्या प्रकृतीचा निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाशी संबंध जोडणं भाजपच्या मीडिया सेल प्रमुखांना महागात पडू शकतं. भाजपने दिलगिरी व्यक्त केली नाही, तर फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात दिला. ‘भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी पवार यांच्या आजारपणावर केलेली टीका दुर्दैवी आहे. भाजपने दिलीगिरी व्यक्त करुन हे थांबवावं. दोन दिवसात दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही बोलायला लागलो तर त्यांच्या (भाजप नेते) कुठून कुठून कळा येतील बघा” असाहि इशारा मुश्रीफ यांनी यावेळी दिला.

भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केले होते. ‘सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवार यांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटतं की, ‘दाल में कुछ काला नही, पुरी दालही काली है’ असे नवीन कुमार जिंदल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शरद पवार यांची ही पोटदुखी पाहता, पश्चिम बंगालच्या आधी महाराष्ट्रातच सत्तांतर होईल, असे वाटत असल्याची खोचक टिप्पणीही नवीन जिंदल यांनी केली होती. शरद पवार यांची पोटदुखी बरी झाली असो वा नसो, लक्षात ठेवा सत्य बाहेर आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा जिंदाल यांनी काल पुन्हा दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात होणाऱ्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाल्यापासून पवार रुग्णालयात दाखल आहेत.

Leave a Comment