ठरलं! राज्यात आज होणार लॉकडाऊनची घोषणा, सूत्रांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : राज्यातील वाढणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत सध्या वीकेंड लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र वेगाने फोफावणार्‍या कोरोनाला रोखायचे असेल तर लॉकडाऊन आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी सांगितले आहे. मात्र लॉकडाऊन किती दिवसांचा आणि कधी करणार याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नव्हती. मात्र ही घोषणा आजच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. आज रात्रीपर्यंत याबाबतची आधीसूचना जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लॉक डाऊनची अधिकृत अधिसूचना जरी आज जाहीर करण्यात येणार असली तरी प्रत्यक्षात लॉक डाऊनची अंमलबजावणी 15 एप्रिल पासून होणार असल्याची माहिती आहे. उद्या म्हणजे 14 एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजल्यापासून लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात येईल. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान जाहीर होणाऱ्या अधिसूचनेमध्ये काय बंद असेल? काय चालू असेल? अत्यावश्यक सेवांच्या बाबतीतला निर्णय? या सर्वांची माहिती जाहीर करण्यात येईल.

राज्यात नवीन 51, 751कोरोना बाधितांची नोंद

दरम्यान राज्यातील करोनासंसर्ग मागील काही दिवसांपासून झपाट्याचे वाढताना दिसून येत आहे. दररोज मोठ्यासंख्येन करोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडत आहे. मागील काही दिवस सातत्याने दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत होते. मात्र आज दिवसभरात आढळलेल्या नवीन करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आढळून आली आहे. राज्यात दिवसभरात ५२ हजार ३१२ रूग्णांनी करोनावर मात केली असून, ५१ हजार ७५१ नवे करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, २५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६८ टक्के एवढा झाला आहे.

याशिवाय राज्यात आजपर्यंत एकूण २८,३४,४७३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.९४ एवढे झाले आहे.

पुणे शहरात दिवसभरात ४ हजार ८४९ करोनाबाधित रूग्ण आढळले असून, ५३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर एकूण करोनाबाधितांची संख्या ३ लाख ३४ हजार ५१० झाली आहे. तर, आजपर्यंत ५ हजार ८०१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ३ हजार ८९६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर २ लाख ७५ हजार ३३३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Leave a Comment