नवी दिल्ली | लोकसभा निवडणूक २०१९ साठी भाजपने आपला जाहीरनामा आज प्रकशित केला आहे. हा जाहीरनामा नवी दिल्ली या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला. आज प्रकाशित करण्यात आलेल्या जाहीरनाम्याला भाजपने संकल्प पत्र असे म्हणले आहे. भारतीय स्वतंत्र्याची ७५ वर्ष आपण २०२२ मध्ये साजरी करणार आहे. यासाठी आपण विकासाचे ७५ मुद्दे घेवून आम्ही ७५ पावले आखली आहेत असे नरेद्र मोदी म्हणाले आहेत.
भाजपच्या जाहीरनाम्यात राम मंदिराचा उल्लेख पुन्हा एकदा करण्यात आला आहे. राम मंदिराच्या उभारीत आमच्या सरकारच्या वतीने महत्वाची भूमिका बजावण्यात येईल असे जाहीरनाम्यात म्हणण्यात आले आहे. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना हि भाजपच्या जाहीरनाम्यातील सर्वात महत्वाची बाब आहे. ६० वर्षावरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे
राम मंदिराच्या उभारणीचे सरकार प्रयत्न करणार
६० वर्षावरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना
शेतकऱ्यांबरोबर शेत मजुराला देखील पेन्शन योजना
६० वर्षावरील छोट्या दुकानदारांना पेन्शन योजना
राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार
शेतकऱ्यानी काढलेल्या १ लाख रुपया पर्यंतच्या कर्जाला ५ वर्ष कोणते हि वाज आकारले जाणार नाही.या बाबत सरकार कर्ज योजना आणणार आहे.
देशातील जलसंपदेचे योग्य आणि काटेकोर नियोजन करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती
देशाच्या अर्थव्यवस्थेत मासेमारी व्यवसाय मोठी भर टाकतो म्हणून मासेमारी मंत्रालयाची निर्मिती
पाणी पुरवठ्याची सर्वव्यापी यंत्रणा उभारणार