बंगरळू (कर्नाटक ) |कर्नाटक कॉंग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणवर बंडाळी पसरल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. कर्नाटक मधील कॉंग्रेस नेत्यांने चक्क भाजपचे समर्थन करणारे वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले आहेत. कॉंग्रेस नेते रोशन बेग यांनी म्हणले आहे कि, जर देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेत येणार असेल तर मुस्लिमांनी मोदींना साथ द्यावी. यांच्या या वक्तव्यावरून कर्नाटकाच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
विधानसभेतली सत्ता गेल्याने कर्नाटक काँग्रेसमध्ये असंतोष आहे. त्यातच केंद्रातही पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याने नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांना तिकीटं दिलं नाही असा आरोप करत राज्यातले काँग्रेसचे नेते रोशन बेग यांनी पक्ष नेतृत्वावर टीकेची झोड उठवलीय.
या आधी प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम आणि ख्रिश्चन उमेदवारांना तिकिटं दिली जात असत या वेळी मात्र फक्त एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं. गरज पडली तर काँग्रेस सोडण्याचाही विचार करेल असंही ते म्हणाले. पक्षाची तिकिटं ही विकण्यात आली आहेत असा आरोप त्यांनी केला. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष गुंडूराव हे बिनकामाचे आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी हे काम करत नाहीत असं यांच्याविरुद्ध ओरडून अर्थ नाही असंही त्यांनी सुनावलं.