मी नरेंद्र मोदींचा द्वेष करतो कारण ते प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत : मुख्यमंत्री

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली |  लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फौरी अधिकच जोरदार झडू लागल्या आहेत. राहुल  गांधी हे नरेंद्र मोदींवर प्रेम करू शकतात मात्र मी करू शकत नाही. कारण नरेंद्र मोदी हे प्रेम करण्याच्या लायकीचे नाहीत असे वादग्रस्त विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांनी केले आहे.  एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

 बोफर्स घोटाळ्यावर नरेंद्र मोदींनी केलेले आरोप आणि त्या आरोपाला राहुल गांधी यांनी दिलेले उत्तर यावर केजरीवाल यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर केजरीवाल म्हणाले कि राहुल गांधी यांनी मोदींच्या आरोपांना दिलेले उत्तर ऐकूण मी आवक झालो आहे.  कारण राहुल गांधी यांनी मोदींना प्रतीत्तर देताना मोदी द्वेष करत असतील तरी मी त्यांच्यावर प्रेम करीन असे म्हणले होते.

राहुल गांधी  यांच्या प्रतीत्तराचा धागा पकडून केजरीवाल यांनी राहुल गांधी  आणि नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलेच तोंड सुख घेतले आहे.  देशाशी गद्दारी करणाऱ्या, मोब लीन्चींग करणाऱ्या, पाकिस्तानी पंतप्रधानाशी हातमिळवणी करणाऱ्या, जाती जातीत आणि धर्माधर्मात भाडणे लावून देणाऱ्या व्यक्ती सोबत मी प्रेम करू शकत नाही असे खरमरीत विधान अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केले आहे.