#Loksabha महाराष्ट्रात कॉंग्रेसला मिळणार फक्त एक जागा?

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसला केवळ एक जागा मिळेल असा अंदाज एका विश्वसनीय एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये वेगवेगळे अंदाज जरी वर्तवले गेले असले तरी राज्यात फक्त एकाच जागी कॉंग्रेस निवडणूक जिंकण्याच्या परिस्थिती मध्ये असल्याचे चित्र आहे. नांदेड मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निवडणूक लढवत आहेत. तेच फक्त सबंध महाराष्ट्रातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून येणार आहेत.

काँग्रेसला धक्का! दक्षिणेतील बड्या नेत्याने टाळला शरद पवारांचा फोन

माहाराष्ट्रात शिवसेना भाजपसाठी अनुकूल वातावरण होते. त्यामुळे शिवसेना भाजपच्या जागा गेल्या निवडणुकी प्रमाणे कायम राहणार असल्याचे बोलले जाते आहे. राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लावणारी निवडणूक म्हणून लोकसभेच्या निवडणुकीकडे पहिले जाते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत.

महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या बड्या नेत्याला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सुरुवातीला लोकसभेची निवडणूक लढायला तयार नव्हते मात्र पक्षादेश शिरसावंद्य मानून अशोक चव्हाण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. नांदेड मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. अशोक चव्हाण यांचे वडील माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी देखील या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गतवेळी मोदी लाटेत देखील कॉंग्रेसचा हा गड ढासळू शकला नाही. यावेळी मात्र भाजपच्या प्रताप पाटील चिकलीकर यांनी चांगलीच लढत दिल्याने हा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

एक्झिट पोलमध्ये पराभव सांगितल्यानंतर, अमोल कोल्हे म्हणतात….

महाराष्ट्रात कॉंग्रेसची स्थिती बिकट असल्याचे लोकसभेच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. कॉंग्रेसला देखील राज्यातील निकाल आपल्या बाजूने लागणार नाही हे माहित असल्याने त्यांनी देखील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. मुंबईत मिलिंद देवरा यांची जागा निवडून येण्याची कॉंग्रसला अपेक्षा होती. मात्र तिथे हि कॉंग्रेसला निराशाच बघायला मिळणार आहे. तर हिंगोलीची जागा देखील कॉंग्रेसकडून शिवसेना खेचून घेणार आहे अशी स्थिती सध्या राजकीय पटलावर स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे येत्या २३ तारखेला निकालातून हेच स्पष्ट होईल कि राज्यात फक्त एकाच जागी कॉंग्रेस विजयी झालेली असेल .

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

#LoksabhaResult : म्हणून होऊ शकतो राजू शेट्टींचा पराभव ?

धक्कादायक! भाजपला मत दिले म्हणून केला पत्नीचा खून

कात्रजमध्ये इस्टेट एजंटचा कोयत्याने सपासप वार करून खून

Breaking | अमळनेर नगरपरिषदेचे २२ नगरसेवक अपात्र

निकालानंतर मोदी नव्हे तर दुसऱ्याच भाजप नेत्याला मिळू शकते पंतप्रधान होण्याची संधी

मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?

सुप्रिया सुळेंनी लोकांची दिशाभूल केली :कांचन कुल