निवडणूक खर्चात तफावत आढळल्याने दोन्ही पाटलांना नोटीस

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,
सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील निवडणूक खर्चात तफावत असल्याच्या तिसऱ्यांदा नोटीस बजावण्याची कारवाई जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केली. दरम्यान भाजपचे उमेदवार संजयकाका यांच्या खर्चात २५ लाख ३४ हजार तर विशाल पाटील यांच्या खर्चात ४ लाख ५ हजार रुपयांची तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे.
 लोकसभेच्या मतदानानंतर सर्व उमेदवारांना एक महिन्यात खर्च सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी तीन टप्यात खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देणे बंधनकारक आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून २२ एप्रिलपर्यंत केलेल्या खर्चाची सविस्तर माहिती उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आणून दिली. त्याची पडताळणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. त्यात निवडणूक प्रशासन आणि उमेदवारांनी दिलेल्या खर्चातील तफावत आढळलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली.
भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांनी ३६ लाख ६६ हजार ९८५ रुपये खर्च झाल्याची माहिती सादर केली आहे. निवडणूक खर्चाच्या नोंदवह्या आणि मूळ प्रमाणके यांची तपासणी केली असता खर्चाच्या नोंदी आणि कार्यालयाकडील निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाच्या निरीक्षण नोंदवहीनुसार 62 लाख 1 हजार 498 रुपये खर्च दिसतो. 25 लाख 34 हजार 513 रुपयांची तफावत असल्याचे दिसून आले. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून 35 लाख 88 हजार 94 रुपये खर्च सादर करण्यात आला आहे. निवडणूक विभागाच्या निरीक्षण नोंदवहीप्रमाणे 39 लाख 94 हजार 48 रुपये खर्च दिसतो. निरीक्षण नोंदवहीप्रमाणे 4 लाख 5 हजार 954 रुपयांच्या खर्चाची तफावत असल्याचे आढळून आले. भाजपचे उमेदवार संजयकाका आणि स्वाभिमानीचे विशाल पाटील यांना खर्चातील तफावतीमुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी नोटिस बजावली आहे.