राज्याचं राजकारण बघून मलाच आता कळायचं बंद झालंय : खासदार उदयनराजे भोसले  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॉकडाऊनसारखी परिस्थिती अशा प्रकारे कायम राहणार असेल तर पुढील काळात कठीण परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत राज्यात दुसरीकडे राजकारणही जोरात चाललं आहे. राजकारण कुठं, कस चाललंय, कोण करतंय? हे बघून आता मलाच कळायच बंद झाल आहे, राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग बनलं आहे, मी काही राजकारण करत नाही मी तर समाजकारण करतो, अस विधान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यात ज्याप्रकारे लॉकडाऊनसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनतेत कमालीची अस्वस्थता आहे. हे निर्बंध घालताना सरकारने विविध क्षेत्रांतील परिणामांचा अजिबात विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करत आहेत. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून अर्थव्यवस्थेलाही त्याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केशकर्तनालय, फेरीवाले, गॅरेजवाले, या सर्वांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना विशिष्ट नियमावली घालून देऊन त्यांचा रोजगार सुरू ठेवणे गरजेचे आहे.

कोरोना हा काही जाणार नाही. लोकप्रतिनिधी लोकांच्या हितासाठी झटत आहेत. लॉकडाऊनबाबत सांगायचं झालं तर त्याच्या अटी शिथिल करणे गरजेच्या आहेत. लॉकडाऊनबाबत लोक रस्त्यावर उतणारच. कोरोनाने खूप भीतीदायक वातावरण लोकांच्यात वातावरण निर्माण केलं आहे. राज्य सरकारने व प्रशासनाने कोरोना काळात कडक अटी लावण्या अगोदर लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावावा. नंतरच लॉकडाऊनबाबत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.

You might also like