हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LPG :आजकाल महागाई दिवसेंदिवस वाढतेच आहे. फळे आणि भाज्यांपासून खाद्यतेल आणि विजेच्या किंमती देखील गगनाला भिडत आहेत. अशातच LPG च्या विक्रमी किंमतीने सर्वसामान्यांच्या घराचे बजट बिघडवले आहे. विशेषत: गरीब वर्गाला त्याची झळ जास्त प्रमाणात बसली आहे.
गेल्या एका वर्षात एलपीजीच्या किंमती 8 वेळा वाढल्या
हे लक्षात घ्या कि, गेल्या वर्षभरात LPG च्या किंमती 8 वेळा वाढल्या आहेत. तर या आठवड्यात एलपीजीचे दर प्रति सिलेंडर (14.2 किलो) 50 रुपयांनी वाढले आहेत. यासह, गेल्या एका वर्षातील एलपीजीच्या किंमतीत एकूण 244 रुपये किंवा 30 टक्के वाढ झाली आहे. विनाअनुदानित एलपीजीच्या सिलेंडरची किंमत (उज्ज्वला योजनेच्या गरीब महिला लाभार्थी वगळता) आता 1,053 रुपयांवर गेली आहे. उज्ज्वला लाभार्थ्यांना प्रति सिलेंडर 853 रुपये मोजावे लागणार आहेत.
टॅक्स नुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये इंधनाची किंमत बदलते
VAT सारख्या स्थानिक टॅक्स नुसार प्रत्येक राज्यानुसार इंधनाची किंमत बदलते. LPG सिलेंडरच्या दरवाढीमुळे घरकाम करणारे, ड्रॉयव्हर, सुरक्षा रक्षक, रोजंदारीवर काम करणारे, सेल्समन आणि वेटर्स यांसारख्या कमी उत्पन्न असलेल्या गटांवर मोठा परिणाम झाला आहे. दरमहा जेमतेम 10,000 ते 15,000 रुपये कमावणाऱ्या या गटाला त्यांच्या कमाईतील 10 टक्के रक्कम फक्त स्वयंपाकावरच खर्च करावी लागत आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/lpg-price.html
हे पण वाचा :
RBI ने ‘या’ को-ऑपरेटिव्ह बँकेवर घातली बंदी, यामागील कारण जाणून घ्या
Indian Overseas Bank चा ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार
आता PAN-Aadhaar Link करण्यास द्यावा लागणार दुप्पट दंड, त्यासाठीची प्रक्रिया तपासा
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू