LPG Subsidy: गॅस सिलेंडरवर किती रुपये आणि कसे अनुदान मिळणार? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरातील एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता फारच त्रस्त आहे. केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना अनुदान दिले जाते. देशातील प्रत्येक राज्यात ग्राहकांना वेगवेगळे अनुदान (LPG Subsidy) दिले जाते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे दहा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना अनुदानाची सुविधा दिली जात नाही. 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरच्या किंमती 25 रुपयांनी वाढविण्यात आल्या.

किती अनुदान मिळते?
गॅस सिलिंडरवर ग्राहकांना 153.86 रुपये दिले गेले, जे केंद्र सरकारने वाढवून 291.48 केले आहेत. त्याच बरोबर पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत यापूर्वी 174.86 रुपयांचे अनुदान देण्यात आले होते, जे आता 312.48 रुपये केले गेले आहे.

आपल्याला अनुदान मिळत आहे की नाही हे घर बसल्या तपासा
>> पहिले आपण इंडियन ऑइलची वेबसाइट https://cx.indianoil.in/ वर भेट द्या.
>> आता तुम्हाला Subsidy Status आणि Proceed वर क्लिक करावे लागेल.
>> त्यानंतर तुम्हाला Subsidy Related (PAHAL) च्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्हाला Subsidy Not Received वर क्लिक करावे लागेल.
>> आपल्याला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि एलपीजी आयडी एंटर करावा लागेल.
>> यानंतर याला वेरिफाय करुन ते सबमिट करा.
>> यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

या क्रमांकावर संपर्क साधू शकता
सबसिडी न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे एलपीजी आयडी खाते क्रमांकाशी लिंक नसणे. यासाठी, आपल्या जवळच्या डिस्ट्रिब्यूटरशी संपर्क साधा आणि त्याला आपल्या समस्येबद्दल जागरूक करा. त्याच वेळी, टोल फ्री क्रमांकावर 18002333555 वर कॉल करून आपण आपली तक्रार नोंदवू शकता.

आधार कार्ड लिंक कसे करावे ?
जर आपण इंडेन गॅसचे ग्राहक असाल तर आपण आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरन एसएमएस पाठवू शकता आणि त्यास लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मेसेज बॉक्समध्ये IOC टाईप करावे लागेल, त्यानंतर एजन्सीचा टेलिफोन नंबरचा STD कोड आणि ग्राहक नंबर टाइप करा आणि कस्टमर केअरला पाठवावा. एकदा तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड झाल्यानंतर, UID <आधार क्रमांक> टाइप करा आणि एजन्सी क्रमांकास द्या. तसेच, आपला आधार नंबर गॅस कनेक्शनशी लिंक केला जाईल. लिंक केला जाताच आपल्याला एक कन्फर्मेशन नंबर मिळेल.

सिलेंडर आतापर्यंत 225 रुपयांनी महाग झाले आहे
डिसेंबरपासून गॅस सिलेंडरच्या किंमतीत 225 रुपयांनी वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये सिलेंडरची किंमत 594 रुपये होती, ती वाढून 819 रुपये झाली. पहिल्यांदा 50 रुपयांची वाढ झाली. यानंतर 25 फेब्रुवारीला गॅसच्या किंमती 25 रुपयांनी वाढविण्यात आल्या आणि त्यानंतर पुन्हा 1 मार्च रोजी 25 रुपयांनी वाढ केली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group