पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक एकमेव पर्याय नाही – लेफ्टनंट जनरल व्ही.जी.पाटणकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी |अजय नेमाने 

चौदा फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला चढवला आणि ३८ जवानांना आपला प्राण गमवावा लागला. त्यानंतर देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त होत असताना, पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची मागणी होत आहे. त्यावर माजी लेफ्टनंट जनरल व्ही. जी. पाटणकर यांनी आज टिप्पणी केली. ते म्हणाले दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा एकमेव पर्याय नसून लष्करांकडे अजून खूप पर्याय असतात. योग्यवेळी योग्य पर्याय वापरला जाईल असेही ते म्हणाले. ते आज पुणे येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

विचारवेध आयोजित सद्यपरिस्थिवरील आधारित ‘काश्मीरच्या समस्या’ या विषयावर त्यांनी विविध मुद्द्यावर मत व्यक्त केले. पाटणकर म्हणाले, काश्मीरच्या खोऱ्यातील नियंत्रण रेषेजवळील भाग हा शांत आहे. आपल्याला इथं बसून जे दिसत की, काश्मीर मध्ये खूप अशांतता आहे. परंतु ते तस नाही. डोंगराळ भाग सोडून जे सपाटीवरील जिल्हे आहेत कुपवाडा, बारामुल्ला, पुलवामा, आनंतनाग, श्रीनगर अशा सहा जिल्ह्यामध्ये दहशतवादी हल्ले करत असतात.

‘सर्जिकल स्ट्राईक’ हा काय पिझ्झा आहे काय? की जो तुम्ही परत परत ऑर्डर कराल. समाज माध्यमावर चाललेल्या बेगड्या देशभक्तीला आणि अजून एकदा सर्जिकल स्ट्राईक झालंच पहिजे! असे म्हणनारऱ्यांना त्यांनी हा सल्ला दिला. तसेच ते म्हणाले आजपर्यंत अशाप्रकारचे छोटेमोठे सर्जिकल स्ट्राईक खूप वेळ झालेले आहेत.

‘सगळे काश्मिरी बंडखोर असतात, त्यांना अजिबात आत्मीयता नाही, ते पाकिस्तानचे लांगुलचालन करतात’ असा एक आपला गैरसमज आहे’ तो आगोदर डोक्यातून काढून टाका. असे गंड मनात ठेवल्यामुळे आपण काश्मीरचा प्रश्न त्यांच्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही.’ असेही पाटणकर म्हणाले.

‘चार दिवसांपूर्वी जो हल्ला झाला. तो खूप क्रूर प्रकार होता. सगळ्यांना ज्याप्रकारचे दुःख आणि हळहळ वाटली तसच मलाही वाटत आहे.’ हे का झालं २००८ नंतर म्हणजेच ११ वर्षानंतर असा हल्ला दहशतवाद्यांनी केलेला आहे. त्याचा विचार होणे गरजेचे आहे. चौकशीत काहीतरी समोर येईलच.’ अशा प्रकारे पाटणकर यांनी घडलेल्या हल्ल्याचे विश्लेषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी तर आभार हे आनंद करंदीकरांनी केले.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे-

भारतीय सैन्यावर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला, ४० जवान शहिद

पैलवान मतिन शेख यांचे थेट छत्रपती शिवाजी महाराजांनाच पत्र

त्या सहा जणींसोबतचा रेल्वेप्रवास..आणि बरंच काही

Leave a Comment