मुख्यमंत्रांच्या उपस्थितीत काँग्रेसचे मदन भोसले यांचा भाजपात प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

काँग्रेस नेते आणि माजी आमदार मदन भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेसला रामरान ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार असल्याचे बोलले जात आहे. “मदन भोसले हे आताचे माजी आमदार पण आता भावी आमदार” असं सुचक वक्तव्य करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भोसले यांचं स्वागत केलं. भुईंज येथे डिस्टलरी प्रोजेक्ट च्या उदघाटन कार्यक्रमाकरता फडणविस आले असता भोसले यांनी भाजपात प्रवेश केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या आग्रहानंतर भोसले यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असल्याचं बोललं जात आहे.

खंडाळा कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदन दादा आता जनतेचा आवाज ऐका अशी हाक दिली होती. तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही जनतेमध्ये जाऊन मदन दादांनी भाजपात यावे का असा सवाल केला होता. यावर नागरिकांनी हात उंचावून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तेव्हापासून मदन दादा भोसले यांच्या भाजप प्रवेशा बाबतच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावर मदन दादा भोसले यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतली होती. या दरम्यानच्या काळात रणजीत सिंग नाईक-निंबाळकर यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीला मदनदादा यांनी गैरहजेरी लावली होती. तसेच लोणंद येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला ते उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे मदन दादा आता भाजपात प्रवेश करणार अशा चर्चांना जोर आला होता.

मदन भोसले काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे पुत्र आहेत. भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. अगोदरच काँग्रेसची अवस्था जिल्ह्यात वाईट असताना त्यात मदन दादांसारखा नेता भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे – 

पवारांची जादू, उदयनराजे व शिवेंद्रराजे एक दिलाने निवडणूक लढवणार

नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?

उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Leave a Comment