सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील राजापुरी गावात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आठ दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले आहे. महाबळेश्वर तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष मधुकर बिरामणे यांच्या 2 चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. चारचाकी गाड्यांची आणि पाईपची तोडफोड करणाऱ्या राजेंद्र राजपुरे याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मधुकर बिरामणे यांनी केली आहे. तसेच्या त्यांनी धरणे आंदोलनही केले.
यावेळी मधुकर बिरामणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सातारा जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे याने माझ्या विरोधात गावामध्ये कलुशित वातावरण तयार केले. त्यामुळे मला गावात राहणे मुश्किल झाले आहे. सातारा बँक संचालक राजेंद निवृत्ती राजपुरे हा व्यक्ती माझ्या विरोधात गावामध्ये गावचा विरोधक असल्याचे वातावरण तयार करत आहे. दि. 17 मार्च रोजी दुपारी 2 वाजता राजपुरी ग्रामपंचायत चे शिपाई आनंदा राजपुरे आणि विशाल आंबाळे माझ्या घरी आले आणि आज गावाची मिटिंग आहे, मिटिंगला या असे सांगितले.
मध्यरात्री माझ्या गाडीवर दगडफेक झाली गाडीची समोरची काच फोडली. मागील बाजूचा दोन ठिकाणी डॅमेज करण्यात आली. याबाबत मी पोलीस स्टेशनला तक्रार करण्यास देण्यास गेलो असता पोलीस अधिकारी रसाळ, कांबळे, जायगुडे आणि एक महिला कर्मचारी उपस्थित होत्या. राजेंद्र निवृत्ती राजपुरे हा व्यक्ती माझ्या कुटुंबाला त्रास देत असलेल्या संदर्भात तक्रार घेतली नाही.
सातारा बँक संचालक राजेंद्र राजपुरे यांच्याकडून गेल्या 8 दिवसात पूर्ण प्लॅनींग करून माझ्या विरोधात शेतात आग लावून माझी मोटर आणि पाईप लाईन जाळून टाकणे, दुचाकी व चारचाकी गाडीचे नुकसान करणे असे प्रकार केले आहेत. त्यामुळे याबाबत संबधीतावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना केली असल्याची माहिती मधुकर बिरामणे यांनी दिली.