पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ चे पोस्टर; वातावरण तापणार?

mafiveer banner in pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यांनतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांवर आरोप केल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने राहुल गांधींचे समर्थन केलं आहे. त्यातच आता पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ ची बॅनरबाजी करण्यात आली असून राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यातील सारसबाग येथील सावरकरांच्या पुतळ्यासमोरच ‘माफीवीर’ असा उल्लेख करत पोस्टर लावले आहेत. मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हे बॅनर लावण्यात आलेले आहे. त्यानंतर एका सावरकरप्रेमी व्यक्तीने हे फ्लेक्स हटवले, सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांनीच माफी मागितली पाहिजे असं सदर व्यक्तीने म्हंटल.

राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल नेमकं काय म्हंटल-

सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे असे एकामागून एक सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केले. येव्हडच नव्हे तर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेली चिट्ठीही त्यांनी वाचून दाखवली.