युती अंतर्गत वाद आणि राज फॅक्टरमुळे सेनाभाजपच्या तब्बल १६ जागा धोक्यात

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही दिवसांचा अवधी बाकी असतांना आता निकाला बाबत उलट सुलट अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. सेना भाजपने आपसातील वाद मिटवून दिलजमाई तर करून घेतली मात्र दोघांमध्ये पहिल्या सारखे सख्य काय निर्माण झालेच नाही. याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे येत्या २३ मेला अनेक धक्कादायक निकाल समोर येवू शकतात.

Supriya Sule यांच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

शिवसेना भाजप भाजप मधील अंतर्गत वादाचा सर्वाधिक तोटा हा शिवसेनेला भोगावा लागणार आहे.कारण भाजपची तगडी ताकद असणारे मतदार संघ देखील भाजपने शिवसेने कडे सोडले होते. मात्र त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचे काम केले नसल्याचे बोलले जाते आहे. यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे तर औरंगाबाद मध्ये भाजपने खौरेंच्या एवेजी अपक्ष हर्षवर्धन जाधव या उमेदवाराला साथ दिल्याची चर्चा आहे. या दोन मतदारसंघाप्रमाणे अमरावती, बुलढाणा, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या शिवसेनेचे उमेदवार असणाऱ्या मतदारसंघात भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला साथ दिली नाही असे देखील बोलले जाते आहे. अशा सर्व परीस्थित येणारे निकाल दोन्ही पक्षांची चिंता वाढवणारे असणार आहेत.

आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता

महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा होती ती राज ठाकरेंच्या “लाव रे तो व्हिडीओ”ची . राज फॅक्टरमुळे भाजपला चांगलाच तोटा सहन करावा लागेल असे राजकीय जाणकार म्हणत आहेत. राज ठाकरे यांच्या भाषणाचे आजवर मतात रुपांतर झाले नसले तरी यावेळीची निवडणूक याला अफवाद ठरणार आहे असे सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून समजते. लोकांच्या मनात भाजप सरकार बद्दल राग होताच तो राग राज ठाकरेंनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून भाजपचा हक्काचा मतदार असणारा शहरी मतदार भाजपपासून दूर जाण्यास मदत झाली असे बोलले जाते आहे. राज ठाकरेंच्या “लाव रे तो व्हिडीओ” मुळे भाजपला मुंबईचे सर्व मतदारसंघ, सोलापूर आणि नांदेड मध्ये विजय हुलकावणी देवू शकतो. तर उत्तर मध्य मुंबई ,ईशान्य मुंबई आणि जालना मतदारसंघात शिवसेनेची नाराजी भाजपला पराभवाचे तोंड पाहण्यास लावू शकते. अशा सर्व राजकीय कृती विकृतीच्या शह काटशहात २३ मेची वाट बघणे सोयीस्कर होणार आहे. मात्र त्या दिवशी बरेच मोठे राजकीय धक्के बसण्याची जाणीव निश्चितच सर्वच राजकीय मंडळीना आहे.

सर्वात वेगवान आणि मोफत  बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा 

whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1

फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl

महत्वाच्या बातम्या 

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड

धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव

अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार