गर्लफ्रेंडचा आक्षेपार्ह व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केला म्हणुन चिडलेल्या त्याने केले ‘असे’ काही; पोलिसही थक्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखाद्या सिनेमामध्ये घडावी अशी एक घटना समोर आली आहे. 2015 मध्ये प्रियसीचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांनी आक्षेपहार्य व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केले आणि तो व्हिडिओ परत इंटरनेटवर व्हायरल करून दिल्याचा राग प्रियकराने मनात धरून, संपूर्ण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या मुलांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. यानंतर आत्तापर्यंत त्याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातून 500 लॅपटॉप चोरी केले. पोलिसांनाही आश्चर्य करायला लावणारी ही घटना काही दिवसांपूर्वी उघड झाल्यानंतर काल आरोपीला जामनगर, गुजरात येथे अटक करण्यात आली आहे.

तमिलसेलवण कन्नन, (24 वर्ष) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कन्नन हा तामिळनाडू राज्यातील असून त्याच्या प्रियसीला वैद्यकीय अभ्यासक्रमातील काही मुलांनी आक्षेपार्ह व्हिडीओ घेऊन ब्लॅकमेल केले होते व नंतर तो व्हिडिओ इंटरनेटवर ही टाकला होता. त्याचा राग कन्नन याने मनात धरून सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या मुलांना धडा शिकवण्याचे ठरवले. 2015 पासून वैद्यकीय शास्त्रातील विद्यार्थ्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने लॅपटॉप चोरी करण्याचे धोरण आखले. तमिळनाडूमध्ये बऱ्याच वैद्यकीय महाविद्यालयात आणि वसतिगृहात चोऱ्या करून नंतर जामनगर गुजरात येथील महाविद्यालयातही चोरी केली. जामनगर येथील ‘एम पी शाह मेडिकल कॉलेज’ या कॉलेजमध्ये चोरी केल्यानंतर पोलीस तपासानंतर याला पकडल्यावर याने पूर्वीच्या 500 चोर्‍यांची कबुली पोलिसांना दिली. पोलिसही काही वेळासाठी हे ऐकून हैराण झाले होते.

2015 मध्ये काही वैद्यकीय अभ्यासक्रमातील मुलांनी एका मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून इंटरनेटवर व्हायरल केला. त्याचाच राग या मुलाने आपल्या मनात ठेवला व त्यातून त्याने या सगळ्या चोर्‍या केल्या’, असे जमनगर बी डिव्हिजनचे पोलीस निरीक्षक के एल गाडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तो सुरुवातीला मेडिकल कॉलेज ची रेकी करत असे व त्यानंतर तो वसतिगृहांमध्ये घुसण्यासाठी मार्ग शोधून वसतिगहा मधून लॅपटॉप चोरी करत असे, असेही गाडे म्हणाले. मोबाईल प्रमाणे लॅपटॉप चोरी केल्यावर तो ट्रॅक करता येत नाही म्हणून आरोपीने लॅपटॉप चोरी केले असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like