हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणा नंतर आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापल आहे. याच दरम्यानओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, अशी खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बोलून दाखवली.
महादेव जानकर यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजपलाही दोषी धरले. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा जानकर यांनी दिला
ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यांच्या लोकसंख्येनुसार त्यांना निधी मिळाला पाहिजे. तसेच ओबीसींना त्यांची आर्थिक आणि सामाजिक भागीदारी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे, असं जानकर म्हणाले. तसेच एनडीए असो की यूपीए या दोघांनीही ओबीसींना पाहिजे त्यांना हक्क दिलेला नाही,असेही त्यांनी म्हंटल