महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं; संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी

0
73
sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रालाही दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले असून आम्ही करेक्ट कार्यक्रम केला अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं. आम्ही महाराष्ट्रावर भगवा फडकला. आमचा मुख्यमंत्री झाला. आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला. यांना काय जमतं असं काही लोक म्हणत होतं. पण आम्ही करून दाखवलं. हे सगळं राजकारणात होत असतं. राजकारण हे काही साधुसंतांचं नाही. राजकारण हे चांगल्या कामाचं आहे. चांगल्या कार्यकर्त्यांचं आहे, असं राऊत म्हणाले

यावेळी त्यांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर केंद्र सरकार वरही निशाणा साधला. 1947 साली जसे आंदोलन झाले, ‘चलेजाव’ची चळवळ झाली म्हणून ब्रिटिश सरकार पळाले. तसेच जनता रस्त्यावर आली असती कोण पंतप्रधान, कोण गृहमंत्री आहे हे जनतेने पाहिले नसते. त्यामुळेच कायदे मागे घेतले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here