शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या या नेत्याने केली आपल्या उमेदवारीची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे रण तापायला सुरुवात झाली असून सेनाभाजपचे जागावाटप कसे होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याच प्रमाणे जागांची अदला बदली देखील केली जाणार आहे. याच शक्यतेला धरून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून समरजितसिंह घाडगे यांनी आपली उमेदवारी स्वतःच जाहीर केली आहे.

कागल विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेना लढवते मात्र यावेळी भाजपने समरजितसिंह घाडगे यांना पक्षात घेऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना महामंडळावर अध्यक्ष म्हणून देखील नेमण्यात आले होते. आता कागल विधानसभा मतदारसंघासाठीआपणच युतीचे उमेदवार असणार अशी घोषणाच समरजितसिंह घाडगे यांनी करून कागल शहरातून रॅली काढली आहे.

कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे आमदार आहेत. गतवेळी सेना भाजपने जंग जंग पछाडले मात्र जनतेने हसन मुश्रीफ यांच्या नावेच आपली पसंदी नोंदवली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक या मतदारसंघाचा चुरशीची ठरणार आहे. या निवडणुकीत लढत देण्यासाठी तगडा मराठा आवश्यक होता. तो भाजपने समरजित घाडगे यांच्या रूपाने मिळवला आहे. त्यामुळे कागल मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.