त्या पक्षासोबत आम्ही युती करू : बच्चू कडू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी राहिले असल्याने आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीला कोणत्याना कोणत्या राजकीय पक्षासोबत युती करण्याचे संकेत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री ४० आमदारांचे तिकीट कापणार ; आमदारांची हाय कमांडच्या पायावर लोटांगण

येत्या निवडणुकीला प्रहारचे ५ ते ६ आमदार आम्हाला निवडून आणायचे आहेत. त्यामुळे ज्या पक्षाला आमचे विचार पटतात त्या पक्षासोबत आम्ही जाणार आहे असे मत बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे. बच्चू कडू यांचे हे वक्तव्य हे नव्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याचे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे.

इंदापूरचे आमदार राष्ट्रवादीला झालेत नकोसे ?

आमदार बच्चू कडू हे अचलपूर मतदाररसंघातून अपक्ष आमदार आहेत. त्यांनी प्रथम प्रहार संघटनेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली. आपल्या लोककार्याने आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकांची कामे करण्यासाठी वाकवण्यासाठी बच्चू कडू हे ओळखले जातात. त्याच प्रमाणे त्यांचे बेजोड वक्तृत्व त्यांच्या नेतृत्वात भर घालते.

थोरात – विखे विमानात शेजारी बसून गेले दिल्लीला ; चर्चेला उधाण

Leave a Comment