तासगाव प्रतिनिधी | विधानसभा निवडणूक जशी जवळ येवू लागली आहे.तसे इच्छुकांचे बाणभात्यातून बाहेर हेवून विरोधकांवर सुटू लागले आहेत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी आर आर पाटलांच्या पत्नी सुमन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आपल्याला या मतदारसंघाची आमदार केल्यास आपण येथील विकासासाठी केंद्रातून निधी खेचून आणू असे आश्वासन देखील सीमा आठवले यांनी येथील जनतेला दिले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या रामदास आठवले यांच्या पक्षाच्या महिला आघाडीच्या मेळाव्यात सीमा आठवले बोलत होत्या. त्या मेळाव्यात त्यांनी केंद्र आणि राज्यांच्या महिलांसाठी असणाऱ्या योजना महिलांपर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे महिला आघाडीच्या नेत्यांना सुचवले. त्यानंतर त्यांनी येथील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडण्यासाठी आपण पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे देखील सांगितले.
सीमा आठवले यांनी तासगाव मतदारसंघातून लढण्याची इच्छा दर्शवल्याने सांगलीचे खासदार संजय पाटील यांचा चांगलाच हिरमुड झाला आहे. कारण या मतदारसंघातून ते त्यांच्या पत्नी ज्योती पाटील यांना तिकीट मिळावे यासाठी आग्रही होते. लोकसभा निडणुकीपासूनच ज्योती पाटील या भागात आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच प्रमाणे येथील लोकांच्या संपर्कात राहून त्यांची कामे करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता सीमा आठवले या तिकीटाची मागणी करू लागण्याने त्यांच्या तयारीला खीळ बसण्याची शक्यता आहे.