एका घरात दोन तिकिटे देण्यास भाजपचा नकार ; ऐनवेळी गणेश नाईकांचा गेम चेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | भाजपची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. या यादीत गणेश नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या पदरी घोर निराशा टाकली आहे. विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करत भाजपने गणेश नाईक यांचा पत्ता कट केला आहे.

गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले असून गणेश नाईक यांना सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. मंदा म्हात्रे राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा सुरु असतानाच त्यांना पक्षाने उमेदवारी देऊन सुखद धक्काच दिला आहे. तसेच भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारखी घराणेशाही चालणार नाही याचा वस्तुपाठ देखील गणेश नाईक यांच्या रूपाने भाजपने घालून दिला आहे.

संपूर्ण कुटुंबासहित भाजपमध्ये दाखल झालेले गणेश नाईक राष्ट्रवादीचे ४८ नगरसेवक देखील घेऊन आले होते.मात्र भाजपमध्ये त्यांना अपेक्षे प्रमाणे मानसन्मान दिला जात नसल्याचे नेहमीच समोर येत आहे. तर त्यांना आगामी काळात विधान परिषदेची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.