पुणेरी पाट्या लावून चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला पुणेकरांनी केला विरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या उमेदवारीला मेधा कुलकर्णींच्या कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्याच प्रमाणे कोथरूड मधील ब्राह्मण वर्गाने देखील त्यांच्या उमेदवारीला विरोध केला असल्याची चर्चा कोथरूड मध्ये जोर धरू लागली आहे. अशा सर्व नाट्यमय हालचाली होत असतानाच आता कोथरूडमध्ये पुणेरी पाट्या देखील झळकल्या आहेत.

पुणेरी पाट्या लावून निषेद करण्याची पुण्याची जुनी संस्कृती आहे. त्या संस्कृतीला साजेशे काळ्या फलकावर पांढऱ्या अक्षरात रेखलेले डिजिटल फ्लेक्स कोथरूड मतदारसंघात दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. त्यात ‘१०० टक्के मतदान नोटा कोथरूड विधानसभा’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. यातून पुणेकरांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनात सुरु असणारी खदखद बाहेर काढली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूड विधानसभा निवडणूक निश्चितच सोपी राहिली नाही.

दरम्यान भाजपच्या १८ विद्यमान आमदारांचे तिकीट कापून देवेंद्र फडणवीस पक्षावर आपली एकाधिकार सिद्ध करण्यास यशस्वी झाले आहेत. पंकजा मुंडे यांचे समर्थक असणारे आमदार संगीत ठोंबरे, आमदार आर. टी. देशमुख आणि सुधाकर भालेराव यांची देवेंद्र फडणवीसांनी तिकिटे कापली आहेत. तर पुण्याच्या शिवाजी नगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांचे तिकीट कापून सिद्धार्थ शिरोळे यांना देण्यात आले आहे. आमदार विजय काळे हे चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.