नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असतानाच त्यांनी स्वतः एक महत्वाची घोषणा केली आहे. भुजबळ सध्या त्यांच्या येवला मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तसेच त्यांनी लोकसंपर्क वाढवला असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र त्यांनी राबवले आहे. अशात त्यांनी विधानसभा निववडणुकीच्या दृष्टीने महत्वाची घोषणा केली आहे.
विजयसिंह मोहिते पाटील काँग्रेस आघाडीला आणखी एक धक्का देणार
छगन भुजबळ आगामी विधानसभा निवडणूक ही येवला मतदारसंघातूनच लढणार असल्याची घोषणा छगन भुजबळ यांनी स्वतः केली आहे. छगन भुजबळ पराभवाच्या भीतीने येवला मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढतील असे बोलले जात होते. ते औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील असे देखील बोलले जात होते. मात्र त्यांनी येवला मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे.
युतीचे ठरलं !असे होणार सेना भाजपमध्ये जागावाटप
बुधवारी छगन भुजबळ यांनी गणेश मंडळांना भेटी देण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्या कार्यक्रमा दरम्यान एका मंडळाला भेट देण्यास गेले असता येथील स्थानिक शिवसैनिकांनी “कोण आला रे कोण कोण आला शिवसेनेचा वाघ आला” अशा घोषणा दिल्या. त्या घोषणा छगन भुजबळांनी देखील थांबवल्या नाहीत. तसेच त्यांचा भगवी शाल पांघरून सत्कार करण्यात आला. त्याला देखील त्यांनी इन्कार केला नाही. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी आहे असेच म्हणावे लागेल. तसेच येवल्यातील स्थानिक शिवसैनिक देखील छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशासाठी आग्रही आहेत. अशा सर्व स्थितीत भुजबळ नेमका काय निर्णय घेतात हे बघण्यासारखे राहणार आहे.
हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेशाचा सावध पवित्रा ; राष्ट्रवादीवर घेतले चांगलेच तोंडसुख