हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. राज्य आर्थिक पाहणी अहवालात राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली होती. मागील तीन वर्षांतील गुन्ह्यांचे आकडे चिंता वाढविणारे आहेत. बलात्कार, विनयभंग, लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांत वाढ होत आहे. वर्षभरात महिलांवरील अत्याचाराच्या ३७ हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अशी माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद केली होती. त्यामुळं यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकाराकडून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सरकारनं महत्वाच्या घोषणा केल्या.
महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असून महिला सुरक्षेला सरकारचं प्राधान्य असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं. त्यानुसार महिलांच्या सुक्षतेसाठी २१ कोटींची रक्कम यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक उभारणार. तसंच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय स्थापणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. नोकरदार मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त तृतीयपंथांसाठी मंडळ स्थापन करण्यात येणारआहे. यासाठी ५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तसंच सामाजिक न्याय विभागासाठी ९ हजार ६६८ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं अर्थंमंत्र्यांनी सांगितलं.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.