कोरोना महामारीशी लढणाऱ्या योध्यांसाठी ‘एवढं कराचं’; उद्धव ठाकरेंचं मोदींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून एमडी आणि एमएसची परीक्षा डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर हे पत्र शेअर केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मध्यस्थी करत भारतीय मेडिकल काऊन्सिलला आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे.

“अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर करोना महामारीशी लढा देण्यास महत्त्वाची भूमिका निभावत असून एमडी/एमएसच्या परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्यासंबंधी आपण मध्यस्थी करत भारतीय मेडिकल काऊन्सिलला आदेश द्यावेत,” अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

 

“परीक्षा द्यावी लागणारे अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर सध्या राज्य सरकार आणि महापालिका मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय व्यवस्थेला मदत करत आहेत. जर वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पडली तर या कठीण काळात प्रशिक्षित डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासेल,” अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रातून सुपर स्पेशलिटी (डीएम/एमसीएच) यांची प्रवेश परीक्षाही डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”