राज्यात एकाच दिवसात आढळले १६२ नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांचा आकडा झाला ‘इतका’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । महाराष्ट्रात कोरोनाने आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत आणखी वाढ करत आहे. धक्कदायक बाब म्हणजे मागील २४ तासात राज्यात करोनाचे १६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णांनंतर राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२९७ वर पोहचली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित संख्या 1297 झाली आहे. यामध्ये मुंबई 143, पुणे 03,पिंपरी चिंचवड 02, यवतमाळ 01, औरंगाबाद 03, ठाणे 01,नवी मुंबई 02, कल्याण-डोंबिवली 04,मीरा-भाईंदर 01,वसई विरार 01,सिंधुदुर्ग 01,अशी 162 रुग्णांची वाढ झाली आहे.

राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळत आहेत. सध्या मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८५७ वर पोहोचली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी येत्या ४ दिवसात मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा साडे तीन हजाराच्या घरात जाईल अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या जरी वाढली तरी परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही असा विश्वासही परदेशी यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत इतर शहरांपेक्षा कोरोना टेस्ट जास्त संख्येत होत असल्यानं मुंबईत जास्त कोरोनाग्रस्त आढळत आहेत. अशी माहितीही त्यांनी दिली.

तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उर्वरित पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. पुणे शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’. 

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment