हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २२ वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्रात भाजप सरकार आल्यापासून देशात एकता अखंडता आणि सर्व धर्म समभावाच्या विचारांना धक्का देण्याचा काम सुरू आहे लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी गंभीर टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
बेरोजगारी महागाई विरोधात संघर्ष करायला हवा
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले आपण अशा देश विरोधी समाज विरोधी विचारांना ठामपणे विरोध केला पाहिजे. रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे माध्यमांमधूनही विरोध दर्शवला पाहिजे देशातील अवस्थेचा परिणाम राज्यावर होत असून महागाई वाढली आहे. मे महिन्यात राज्याच्या तिजोरीत 14 हजार कोटी आले त्यातील 12 हजार कोटी पगारात जातात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढलया आहेत. मनमोहन सिंग सरकार असताना 75 रुपये पेट्रोलचा दर होता तो 105 रुपये झाला. गॅस सिलेंडर 400 वरून 900 रुपये झाले टीव्ही चॅनेल साठी ५०० रुपये भरावे लागतात. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. आपल्याला बेरोजगारी महागाई विरोधात संघर्ष करायचा आहे असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी जनतेशी नाळ जोडलेला पक्ष
राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या मातीशी नातं सांगणारा पक्ष आहे. जनतेशी नाळ जोडलेला हा पक्ष आहे. आज कोरोनाचे संकट आहे सरकार स्थापन केल्यानंतर चार महिन्यात कोरोना संकटावरून विरोधक वेगवेगळ्या प्रचार करतात पण सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टानं कौतुक केलं. जगात काय चाललंय हे आपण पाहिलं तर देशात यमुना गंगेच्या तीरावरील दुर्दैवी चित्र आपण पाहिलं असं अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.जात पात पंथ भेदभाव न करता राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना स्वाभीमानाने केली. राष्ट्र हा व्यापक विचार ठेवून पक्षाची स्थापना झाली. अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली. या सगळ्यांमुळे पक्षाचा वर्धापनदिन साजरा होतोय असेही पवार यावेळी म्हणाले.
केंद्राचा सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न आपण सगळी करत आहोत. पण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता प्रत्येक वेळी मदतीसाठी बाहेर येतो आज पर्यंत हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला. कोरोना संकट दूर होईपर्यंत हे करावंच लागणार. या आव्हानांचं रूपांतर संधीत करणे आवश्यक आहे असं आवाहन त्यांनी यावेळी केला.