Breaking News : राज्यात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाउन; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज सुमारे 45 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाऊन असेल असं मलिक यांनी सांगितले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विकेंड लॉकडाऊचा निर्णय घेण्यात आला असून शनिवार रविवार लॉकडाउन होणार आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

या दरम्यान बार हॉटेल मॉल बंद राहणार. तसेच भाजी मंडई देखील बंद राहणार अस नवाब मलिक यांनी सांगितले. जनतेने नियमांचे पालन करावे अस आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. लॉकडाउन बाबत सर्व राजकीय पक्षांशी बोलून चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे असेही ते म्हणाले.

महत्वाचे मुद्दे –

अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी राहणार

गृहनिर्माणची सर्व कामे सुरू

भाजी मंडई बंद राहणार

बार हॉटेल मॉल बंद राहणार

सर्व मैदाने आणि सभागृह बंद राहणार

ऑफिस50 % क्षमतेने सुरू

सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार

उद्याने समुद्रकिनारे चित्रपटगृह बंद

दुकान आणि हॉटेल मध्ये पार्सल सेवा सुरू राहणार

रिक्षा टॅक्सी खाजगी बसेस सुरू राहणार

मुंबई लोकल वाहतूक सुरू राहणार

सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही

दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत.